SplitEase पेमेंट्सची संख्या कशी कमी करते?

मोठ्या ग्रुपमध्ये लोकांची एकमेकांना देणी गोल गोल फिरू शकतात. सर्व शिल्लक मिटवणारी सर्वात कमी पेमेंट्स SplitEase शोधून काढू शकते.

पायऱ्या

  1. ग्रुप उघडा आणि हिशेब चुकता करा (Settle up) वर टॅप करा.
  2. प्रत्येक व्यक्ती (Per person) वरून ऑप्टिमाइझ्ड (Optimized) वर जा.
  3. यादीतील पेमेंट्स करा आणि प्रत्येक पेमेंट नोंदवा.

प्रत्येक व्यक्ती (Per person) मध्ये तुम्ही प्रत्येक व्यक्तीला थेट किती देणे आहे ते दिसते. दोन्ही व्ह्यूमध्ये चुकता होणारी एकूण रक्कम सारखीच असते.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी