एका ग्रुपमध्ये एकापेक्षा जास्त चलने वापरता येतात का?

हो. प्रत्येक ग्रुपचे एक डिफॉल्ट चलन असते, आणि प्रत्येक खर्चासाठी वेगळे चलन वापरता येते, जे परदेश प्रवासात उपयोगी पडते.

पायऱ्या

  1. खर्च जोडताना किंवा संपादित करताना रकमेशेजारील चलन चिन्हावर टॅप करा आणि चलन निवडा.
  2. ग्रुपचे डिफॉल्ट चलन बदलण्यासाठी ग्रुप सेटिंग्ज (Group settings) उघडा आणि डिफॉल्ट चलन (Default currency) वर टॅप करा. ते फक्त ग्रुप ॲडमिन बदलू शकतात.

SplitEase चलनांचे एकमेकांत रूपांतर करत नाही. शिल्लक आणि चुकता करायची रक्कम प्रत्येक चलनासाठी वेगवेगळी दाखवली जाते.

नवीन ग्रुपचे चलन प्रोफाइल (Profile) → चलन (Currency) मधून घेतले जाते.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी