खर्च कसा जोडायचा?

ग्रुपच्या शेअर केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी कोणी पैसे भरले की खर्च जोडा. तुम्ही सेव्ह करताच SplitEase सर्वांची शिल्लक अपडेट करते.

पायऱ्या

  1. टॅब बारच्या मधोमध असलेल्या + बटणावर टॅप करा, किंवा ग्रुप उघडून खर्च जोडा (Add expense) वर टॅप करा.
  2. वर ग्रुप तपासा, मग रक्कम (Amount) टाका आणि खर्च कशासाठी होता ते लिहा.
  3. कोणी भरले (Paid by) मध्ये कोणी पैसे भरले ते निवडा.
  4. विभागणी (Split) मध्ये खर्च कोणामध्ये आणि कसा विभागायचा ते निवडा. डिफॉल्टनुसार समान विभागणी असते.
  5. सेव्ह करा (Save) वर टॅप करा.

SplitEase वर्णनावरून एक श्रेणी सुचवते. सेव्ह करण्यापूर्वी तुम्ही ती बदलू शकता.

वेगळ्या चलनात खर्च टाकण्यासाठी रकमेशेजारील चलन चिन्हावर टॅप करा.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी