खर्च कसा संपादित करायचा किंवा हटवायचा?

सेव्ह केल्यानंतरही तुम्ही खर्च दुरुस्त करू शकता. ग्रुपमधील सर्वांना अपडेट झालेली शिल्लक दिसते.

पायऱ्या

  1. ग्रुप उघडा आणि खर्चावर टॅप करा.
  2. बदल करण्यासाठी संपादित करा (Edit) वर टॅप करा, बदल करा आणि सेव्ह करा (Save) वर टॅप करा.
  3. काढून टाकण्यासाठी ⋯ बटणावर टॅप करा, मग हटवा (Delete) वर टॅप करा आणि खात्री करा.

हटवलेला खर्च परत आणता येत नाही.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी