SplitEase+

पावती स्कॅन करून खर्च कसा जोडायचा?

पावती स्कॅनिंग बिलावरून एकूण रक्कम आणि तपशील वाचते, त्यामुळे तुम्हाला टाइप करावे लागत नाही. हे SplitEase+ चा भाग आहे.

पायऱ्या

  1. + बटणावर टॅप करा, मग स्कॅन (Scan) वर टॅप करा.
  2. संपूर्ण बिलाचा फोटो काढा, किंवा आधीपासून असलेली फाइल वापरण्यासाठी गॅलरी (Library) किंवा PDF निवडा.
  3. SplitEase ला सापडलेले तपशील तपासा आणि वापरा (Use) वर टॅप करा.
  4. कोणी पैसे भरले आणि विभागणी कशी आहे ते तपासा, मग सेव्ह करा (Save) वर टॅप करा.

इमेज वाचण्यासाठी ती SplitEase वर अपलोड केली जाते. ती कशी हाताळली जाते ते आमच्या गोपनीयता धोरणात पाहा.

स्कॅनमध्ये चुका होऊ शकतात. सेव्ह करण्यापूर्वी रक्कम नेहमी तपासा.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी