एखाद्यासोबत हिशेब कसा चुकता करायचा?
कोणाचे कोणाला किती देणे आहे याचा हिशेब SplitEase ठेवते, पण पेमेंट हाताळत नाही. तुम्ही नेहमी जसे पैसे देता तसे समोरच्या व्यक्तीला द्या, मग ॲपमध्ये नोंद करा म्हणजे दोघांची शिल्लक अपडेट होईल.
पायऱ्या
- ग्रुप उघडा आणि हिशेब चुकता करा (Settle up) वर टॅप करा.
- तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर त्यांच्या नावाशेजारी पेमेंट नोंदवा (Record payment) वर टॅप करा, रक्कम तपासा आणि खात्री करा. तुम्ही देणे असलेल्या रकमेचा काही भागही नोंदवू शकता.
- एखाद्याने तुम्हाला पैसे दिले असतील तर त्यांच्या नावाशेजारी मिळाले म्हणून नोंदवा (Mark as received) वर टॅप करा आणि खात्री करा.
आधीची पेमेंट्स पाहण्यासाठी त्याच स्क्रीनवर इतिहास (History) वर टॅप करा.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.