आमंत्रण कोड किंवा लिंकने ग्रुपमध्ये कसे सामील व्हायचे?
कोणी तुम्हाला आमंत्रण लिंक पाठवली असेल तर ती फोनवर उघडा, SplitEase तुम्हाला ग्रुपमध्ये सामील करेल. तुम्ही अजून साइन इन केले नसेल तर साइन इन केल्यावर लगेच तुम्ही ग्रुपमध्ये सामील व्हाल.
पायऱ्या
- होम (Home) टॅबवर सामील व्हा (Join) वर टॅप करा.
- आमंत्रण कोड टाइप करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा (Join Group) वर टॅप करा.
- किंवा ग्रुपचा QR कोड स्कॅन करण्यासाठी QR कोड स्कॅन करा (Scan a QR code) वर टॅप करा, किंवा लिंक कॉपी केली असेल तर आमंत्रण लिंक पेस्ट करा (Paste an invite link) वर टॅप करा.
कोड चालत नसेल तर कदाचित त्याची मुदत संपली असेल. ज्यांनी तुम्हाला आमंत्रित केले त्यांच्याकडे नवीन कोड मागा.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.