ग्रुपचे खर्च कसे एक्सपोर्ट करायचे?
तुमच्या नोंदींसाठी किंवा शेअर करण्यासाठी तुम्ही ग्रुपचे खर्च फाइल म्हणून SplitEase मधून बाहेर काढू शकता. हे SplitEase+ चा भाग आहे.
पायऱ्या
- ग्रुप उघडा, मग ग्रुप सेटिंग्ज (Group settings) उघडा.
- हिशेब एक्सपोर्ट करा (Export ledger) वर टॅप करा.
- PDF, CSV किंवा Excel निवडा. चुकते केलेले हिशेब समाविष्ट करा (Include settlements) चालू किंवा बंद करा.
- एक्सपोर्ट करा (Export) वर टॅप करा, फाइल तयार होईपर्यंत थांबा, मग ती सेव्ह किंवा शेअर करा.
फाइल फक्त एकदाच डाउनलोड करता येते. स्क्रीन बंद करण्यापूर्वी ती सेव्ह करा किंवा पाठवा.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.