नियमित खर्च कसा सेट करायचा?
नियमित खर्च त्याच्या तारखेला आपोआप ग्रुपमध्ये जोडला जातो, तुम्ही सेट केलेल्या विभागणीनुसार. हे SplitEase+ चा भाग आहे.
पायऱ्या
- ग्रुप उघडा, मग ग्रुप सेटिंग्ज (Group settings) उघडा.
- नियमित खर्च (Recurring expenses) वर टॅप करा, मग जोडा (Add) वर टॅप करा.
- रक्कम, कोण भरणार आणि विभागणी कशी असेल ते टाका, मग तो किती वेळा पुन्हा होईल ते निवडा: दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला किंवा दरवर्षी.
- सेव्ह करा (Save) वर टॅप करा.
एखादी वेळ वगळण्यासाठी नियमित खर्च उघडा आणि पुढचा खर्च वगळा (Skip the next occurrence) वर टॅप करा. त्यानंतर वेळापत्रक नेहमीप्रमाणे सुरू राहते.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.