SplitEase चा व्हेरिफिकेशन कोड आला नाही
SplitEase तुमच्या फोन नंबरवर SMS ने पाठवलेल्या 6 अंकी कोडने तुम्हाला साइन इन करते.
पायऱ्या
- स्क्रीनवरील नंबर बरोबर आहे का ते तपासा. नसेल तर बदला (Change) वर टॅप करा आणि नंबर पुन्हा टाका.
- एक मिनिट थांबा. तुमच्या नेटवर्कमुळे मेसेज उशिरा येऊ शकतात.
- कोड मिळाला नाही? (Didn't get it?) वर टॅप करा. 60 सेकंदांनंतर आता पुन्हा पाठवा (Resend now) उपलब्ध होते. नवीन कोड मिळवण्यासाठी त्यावर टॅप करा.
- तुमच्या फोनला सिग्नल आहे आणि तो अनोळखी पाठवणाऱ्यांचे मेसेज ब्लॉक करत नाही याची खात्री करा.
खूप जास्त प्रयत्नांनंतर पुन्हा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्हाला काही मिनिटे थांबायला सांगितले जाईल.
तरीही कोड आला नाही? वापरलेल्या फोन नंबरसह आमच्याशी संपर्क साधा.
SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.