माझे SplitEase खाते कसे हटवायचे?

तुम्ही ॲपमधून कधीही तुमचे खाते हटवू शकता. आधी इतरांसोबतची तुमची शिल्लक चुकती करा.

पायऱ्या

  1. प्रोफाइल (Profile) वर जा आणि खाते (Account) वर टॅप करा.
  2. खाते हटवा (Delete Account) वर टॅप करा.
  3. मेसेज वाचा आणि होय, माझे खाते हटवा (Yes, delete my account) वर टॅप करा.

हटवलेले खाते परत आणता येत नाही.

आता साइन इन करता येत नाही? तरीही तुम्ही आम्हाला खाते हटवायला सांगू शकता. आमच्या तुमचे खाते हटवा पेजवर ते कसे करायचे आणि तुमच्या डेटाचे काय होते ते सांगितले आहे.

SplitEase ॲप अजून मराठीत उपलब्ध नाही. कंसात दिलेली बटणांची नावे स्क्रीनवर इंग्रजीत जशी दिसतात तशीच आहेत.

संबंधित प्रश्न

अजूनही मदत हवी आहे?

आम्हाला लिहा, SplitEase टीममधील एखादी व्यक्ती तुम्हाला उत्तर देईल.

सपोर्टशी संपर्क साधा
भाषा: मराठी